17/05/2026
ज्यांना ढोबळी मिरची आवडत नाही ते सुद्धा ही भाजी आवडीने खातील | ही सिमला मिरची एकदा खाल्ली तर पुन्हा पुन्हा बनवाल |
[shimla mirchi recipe, capsicum masala recipe, restaurant style recipe, dahi wali shimla mirchi, marathi recipe, homemade curry recipe, capsicum curry, butter masala recipe, indian veg recipe, easy dinner recipe]
🫑🔥 रेस्टॉरंट स्टाईल दही मसाला सिमला मिरची
सर्वप्रथम 2–4 सिमला मिरच्या स्वच्छ धुवून घ्या.
आता त्यामधील बिया काढून टाका आणि सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्या.
यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करा आणि सिमला मिरची हलकी अर्धवट शिजेपर्यंत फ्राय करून घ्या.
फ्राय केलेली सिमला मिरची एका बाऊलमध्ये काढून ठेवा.
आता त्या बाऊलमध्ये दही, लाल तिखट, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, कसुरी मेथी, आलं-लसूण पेस्ट, आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट, चवीनुसार मीठ, टोमॅटो, उभी चिरलेली हिरवी मिरची आणि बरीस्ता (तळलेले कांदा )घाला.
हे सगळं छान एकजीव करून सिमला मिरचीला 15 मिनिटं मॅरिनेट होऊ द्या.
यानंतर एका पॅनमध्ये बटर आणि थोडंसं तेल घाला.
बटर जळू नये म्हणून तेल घालून दोन्ही छान गरम होऊ द्या.
आता त्यामध्ये मॅरिनेट केलेलं सिमला मिरचीचं मिश्रण घाला आणि मध्यम आचेवर छान खमंग होईपर्यंत शिजू द्या.
मसाला सिमला मिरचीला छान लागला की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला 😍🔥
खमंग रेस्टॉरंट स्टाईल सिमला मिरची तयार 😋
गरम पोळी, पराठा किंवा पुलावसोबत सर्व करा ✨