04/04/2024
गोष्ट घराची......
प्रत्येक प्रोजेक्टची आव्हानं हि वेगवेगळी असतात......
आज जानेवारीत पूर्ण झालेल्या माझ्या नेरळच्या एका बंगल्याच्या प्रोजेक्टविषयी 'रिनोवेशन्स आणि इंटिरिअर डिझायनिंग' या माध्यमातून तुमच्याबरोबर काही अनुभव शेअर करणार आहे......
☺️☺️☺️
तुम्हाला सगळ्यांना माहित आहेच कि मी माझ्या टीमबरोबर इंटिरिअर डिझायनींग आणि रिनोवेशन्स या दोन्ही ऑप्शन्समधून काम करते......नेरळच्या या बंगलो प्रोजेक्टमधे इंटिरिअर डिझायनिंग या अॅगलमधून कामाचा जास्त आवाका नव्हता, तर २० वर्षांपूर्वीच्या या बंगल्याला परत एकदा रिस्ट्रक्चर करायचं होतं......कामाचा volume जास्त होता, पण सजावट हा मूळ हेतू नव्हता.......
साध्या मराठीत सांगायचं झालं तर डागडुजी करायची होती, जे काम वाटतं तितकं साधं आणि सोपं अजिबात नव्हतं.....मुख्यतः सिव्हील कामाचा आवाका खूप जास्त होता......
ब-याचदा आमच्या इंटिरिअर्स प्रोजेक्टमधे असं असतं कि तयार झालेलं नवीन घर आमच्यासमोर येतं किंवा अगदी प्लींथ लेवलपासून डिझायनिंग आमच्याकडे असतं......पण यावेळी तसं नव्हतं.....
बंगल्याचे मालक श्री.विनय सोमणी व त्यांचा मुलगा श्री.विराज सोमणी यांच्याबरोबर पहिली मिटिंग झाली......मेजरमेंट्स घेतली गेली......BOQs (कोटेशन्स) तयार झाली......approved झाली......आणि कामाला सुरूवात झाली......साधारण काम पूर्ण व्हायला दीड महिना लागला......
आपल्या शरीराचं जसं स्कॅन केल्यानंतर आपल्याला आपल्या शरीरातला झालेला बिघाड लक्षात येतो, घराच्या भिंतीचं देखील तसंच असतं......आधीचं बांधकाम जुनं असलं तरी लोकल कामगारांनी केलेलं काम आणि आमच्याकडच्या स्किल्ड कामगारांनी केलेलं काम......यांत खूप फरक हा असतोच.......
आधीचं जे बंगल्याच्या छताच्या बाहेरील भागाचं डिझाईन होतं, ते पूर्णपणे डिमाॅलीश करून नवीन डिझाइन केलं, जिथून खूप मोठ्या प्रमाणावर लिकेजचा प्राॅब्लेम होता.......आणि या लिकेज प्राॅब्लेममुळे काम वाढलं.......
पाण्याला वाट मिळेल तसं पाणी वळतं, त्यामुळे लिकेजचा मेन स्त्रोत कुठून आहे हे चेक करणं आणि त्याप्रमाणे पुढे अॅक्शन ठरवणं, हा महत्वाचा टास्क होता आमच्यासाठी......ज्यात आम्ही यशस्वी झालो......
आतल्या बाहेरच्या सर्व भिती, सिलिंग्स, गच्ची......सगळ्याच ठिकाणी परत पूर्ण प्लॅस्टरींग करणं नितांत आवश्यक होतं.....
घराची उंची चांगली असल्याने false ceiling (gypsum) करायचं नाही असं मी आणि सोमणी कुटुंबियांनी आधीच ठरवलं होतं......त्यामुळे नवीन इलेक्ट्रीक वायरींग करून surface lights लावायचं ठरवलं......लाईट्सबरोबर रंगांची जोड लागल्यावर बंगल्याचं रूपडंच बदललं.....येणाऱ्या जाणा-या प्रत्येकाचं बंगल्याकडे लक्ष जात होतं......काहीजण आत येऊन बंगल्याचं बदललेलं रूप न्याहाळत होते.......केलेल्या कामाचं चीज होत होतं........☺️☺️☺️
आता बंगला पुढची १०-१५ वर्ष तरी त्याच्या पायावर आनंदाने उभा राहू शकतो.......आणि या गोष्टीचा आनंद अवर्णनीय असतोच आणि सोमणी कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही देऊन जातो......आणि कामाच्या टर्म्स मधून बघितलं तर सोमणी कुटुंबियांनी त्यांच्या नवीन फ्लॅटच्या डिझायनिंगचं काम मला दिलं आणि ते आता सुरूही झालंय......☺️☺️☺️
सांगायचा मुद्दा हा आहे कि कधीकधी इंटिरिअर्स या अॅगलने काम करणं जितकं सोपं असतं, तितकंच एखाद्या बंगल्याला परत एकदा स्कॅन करून नवीन स्ट्रक्चरल रूप देणं थोडं जास्त आव्हानात्मक असतं......पण हेही तितकंच खरं आहे कि काम पूर्ण झाल्यानंतरचा क्लाएंटच्या चेह-यावरचा आनंद आणि डोळ्यातून आमच्यासाठी दिसणारी विश्वासार्हता हि अतिशय मोलाची असते......
यावेळचं लिखाण जरा technical झालंय, पण जागेच्या सौंदर्याबरोबरच ती जागा तितकीच सृदुढ असणंही गरजेचं आहे......
तुम्हाला तुमच्या जुन्या बंगल्याला नवीन रूप द्यायचं असेल तर मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहेच......
☺️☺️☺️
स्मिता जोशी
रचना इंटिरिअर डिझायनर्स
भ्रमणध्वनी :- ९६१९७२२९९१
इ मेल :- [email protected]
*Making space for you......*