PapiersnShapers

  • Home
  • PapiersnShapers

PapiersnShapers Our Eco-Friendly Paper Products will enhance the beauty of your homes without degrading the Nature.

Celebrating 77th Republic Day
25/01/2026

Celebrating 77th Republic Day

With Soumitra Pote – I just got recognized as one of their top fans! 🎉
24/01/2026

With Soumitra Pote – I just got recognized as one of their top fans! 🎉

ग्रेट भेट ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना भेटण्याचा योग आला, निमित्त होतं गोविंदराव टेंबे यांच्या पुस्तकांचे प्...
21/01/2026

ग्रेट भेट
ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना भेटण्याचा योग आला, निमित्त होतं गोविंदराव टेंबे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन. ही भेट सौमित्र मुळे सहज शक्य झाली त्यावेळी त्याने टिपलेला हा अविस्मरणीय क्षण.

Happy New Year
01/01/2026

Happy New Year

चला करूया सीमोलंघन विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा चिदंबर पेपर्स एन शेपर्स
02/10/2025

चला करूया सीमोलंघन
विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा
चिदंबर
पेपर्स एन शेपर्स

शारदीय नवरात्रानिमित्त मला भेटलेल्या नवदुर्गांबद्दल लिहिण्याचा एक छोटासा  प्रयत्न होता. लिखाण हा माझा प्रांत नाही त्यामु...
30/09/2025

शारदीय नवरात्रानिमित्त मला भेटलेल्या नवदुर्गांबद्दल लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. लिखाण हा माझा प्रांत नाही त्यामुळे हे काम कितपत जमेल याची शंका होती. पण आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे जमून गेले त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. नवदुर्गा मालिकेतील हा शेवटचा लेख आहे.
या लेखमालेची सुरुवात माझ्या जन्मदात्या आईपासून केली होती तर त्याचा शेवट हा कृतप्रज्ञ मातेने करत आहे.

कांचन ताई परुळेकर
कांचन ताईंचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. एका राष्ट्रीयकृत बँकेत उच्च पदावर काम करत असताना, 'आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते वेळीच दिले पाहिजे', हा काकाजींचा संस्कार त्यांना अस्वस्थ करत होता. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि महिला सबलीकरणाचे छोटेसे रोपटे लावले व सर्व नीतीमूल्य जपत स्वयंसिद्ध नावाचा वटवृक्ष तयार केला.
ताईंचा स्वभाव हा शिस्तबद्ध होता. त्यांना कामचुकारपणा अजिबात आवडत नसे. एखाद्याची चूक लक्षात येता त्याला तिथेच ती दुरुस्त करावयास लावायच्या, मग ती व्यक्ति कोणीही असो एखादी सामान्य कार्यकर्ती अथवा उच्च पदावरील अधिकारी. सभोवताली होणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर त्यांची बारीक नजर असायची. एखादा नवीन व्यवसाय किंवा कलाकृती नजरेस पडली तर लगेच त्या व्यक्तीला बोलवून तिला शाबासकी व व्यवसाय विस्तारासाठी मार्गदर्शन करायच्या.
प्रत्येकाच्या जीवनात असे एक वळण येते की तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. माझ्या सुदैवाने त्या वळणावर मला ताई भेटल्या. 'तू करत असलेले काम हे वेगळे आहे आणि याची चांगली प्रगती व विस्तार करणे गरजेचे आहे' हे त्यांनी मला पटवून दिले. सुरुवातीस वेगवेगळ्या प्रदर्शनात मोफत प्रवेश देणे, स्वयंसिद्धा मध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना माझ्या कामाविषयी माहिती देणे, संस्थेतील विविध स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून या पर्यावरणपूरक वस्तू भेट देणे तसेच या वस्तू तयार करण्याच्या कार्यशाळा घेऊन त्यांनी माझ्या व्यवसायाचा पाया भक्कम केला. हे सगळं ताई का करतात? यात त्यांचा काय फायदा आहे? असे प्रश्न मला सुरुवातीच्या काळात पडायचे. पण जसजसा ताईंचा सहवास वाढत गेला तसतसे लक्षात आले की ही अतिशय निस्वार्थी भावनेने केलेली समाजसेवा आहे. त्यांच्याबरोबर गप्पा मारणे म्हणजे एक पर्वणीच. अतिशय मुद्देसूद तसेच समोर आलेल्या प्रश्नाचे तर्कशुद्ध व अभ्यासपूर्ण उत्तर असायचे. त्या आमच्यासाठी एक ज्ञानकोश होत्या. कांचन ताई म्हटलं की महिला सबलीकरण हे चित्र पटकन सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते पण त्याच्याबरोबर त्यांनी माझ्यासारख्या कितीतरी तरुणांना आर्थिक, वैचारिक व सामाजिक दृष्ट्या समृद्ध केले.
ताईंनी कॅन्सर सारख्या आजाराला सुद्धा खूप खंबीरपणे लढा दिला. पण म्हणतात ना 'वेळ आणि काळ कुणासाठी थांबत नाही'. ताईंची प्रकृती गंभीर आहे, भेटून जा. असा तारा चा फोन आला आणि लगेचच त्यांना भेटायला गेलो. प्रचंड वेदना होत असताना सुद्धा त्यांनी मला नेहमी प्रमाणे विचारले, चिदंबर नवीन काय केल आहेस? मी त्यावेळी निःशब्द झालो होतो अणि आजही. . .

समाज कल्याणाचे व्रत शेवटपर्यंत उराशी बाळगणाऱ्या या कृतप्रज्ञ मातेला माझे शतशः नमन.

चिदंबर
पेपर्स एन शेपर्स
कोल्हापूर
#नवदुर्गा

Swayamsiddha Kolhapur

डॉ. अंजली राजेंद्र पाटील निसर्ग संवर्धनाचे बाळकडू वडिलांकडून मिळालेल्या व लहानपणापासूनच निसर्गाची आवड असलेल्या अंजली मॅड...
29/09/2025

डॉ. अंजली राजेंद्र पाटील
निसर्ग संवर्धनाचे बाळकडू वडिलांकडून मिळालेल्या व लहानपणापासूनच निसर्गाची आवड असलेल्या अंजली मॅडम यांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण होलीक्रॉस तर महाविद्यालयीन राजाराम कॉलेज आणि एम एस सी व पीएचडी ही शिवाजी विद्यापीठात झाली. वनस्पती शास्त्रामधील मायकोलॉजी अशा अवघड विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली. आज पर्यंत त्यांनी जे काही यश मिळवले आहे त्याचे श्रेय ते शाळेतल्या शिक्षकांना व शिस्तीला देतात. निसर्ग संवर्धनाची गरज ही त्यांना सामंत सर व करकरे सरांच्या मार्गदर्शनामुळे समजली. पण या सर्व प्रवासात त्यांचे खरे आयडॉल आहेत ते त्यांचे वडील डॉ. मनसाराम पाटील सर, हे शिवाजी विद्यापीठात वनस्पती शास्त्राचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहायचे. एखादा अवघड विषय स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून सोपा करून शिकवणे यात पाटील सरांचा हातखंड होता. वडिलांबरोबर त्या लहानपणापासूनच बॉटनीच्या सॅम्पल कलेक्शन ला जात होत्या.
अंजली मॅडम सध्या राजाराम कॉलेज येथे वनस्पतीशास्त्राच्या विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात. त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत. विद्यार्थ्यांना सतत नवनवीन गोष्टी कल्पकतेने कशा शिकवता येतील यावर त्या नेहमी काम करत असतात. त्यांच्या मते तरुणपणी झालेले संस्कार आणि लागलेली शिस्त या गोष्टी आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडतात. 'वनस्पती शास्त्र हा विषय फक्त वर्गात बसून शिकण्यासारखा नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करत असताना तेथे उगवलेल्या वनस्पतींचा अभ्यास करण्याचा आहे', असे त्यांचे नुसते मत नसून त्या विद्यार्थ्यांना घेऊन शनिवार /रविवारी अशा भ्रमंतीचे कार्यक्रम आयोजित करतात आणि बऱ्याच वेळेला या सर्व भ्रमंतीचा खर्च त्या स्वतःच करतात. मुलांनी भरपूर शिकलं पाहिजे असे त्यांचे मत आहे.
निसर्ग संवर्धनासाठी वृक्षारोपण अथवा व्याख्याने यातून फारसा फरक पडत नाही तर यापुढे जाऊन युवकांमध्ये संवर्धनाचा विचार खोलवर रुजवणे गरजेचे आहे. आपल्या देशातील लोकसंख्येमुळे नोकऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे स्किल बेस शिक्षण देणे गरजेचे आहे. जेव्हा एखादे शिबिर घेण्याचा प्रस्ताव येतो तेव्हा ते स्किल बेस आणि पर्यावरण पूरक आहे ना हे बघितले जाते. असा एक वेगळा विचार घेऊन अंजली मॅडमनी बरीच शिबिरे घेतलेली आहेत. त्यातील एका शिबिराबद्दल आपण जाणून घेऊ.
बांबू व बांबूच्या वस्तूंचे एक शिबिर झाले होते. यामध्ये बांबूची लागवड, बांबू कशा कशासाठी वापरला जातो, बांबूची बाजारपेठ कुठे आहे व बांबू पासून तयार होणाऱ्या वस्तू तसेच त्याची किती मागणी आहे यासारख्या अनेक आयामांचा विचार केला जातो. हे सर्व विषय प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समजावून सांगितले जातात. तर यातून बांबूची लागवड, नवनवीन कलात्मक वस्तूंची निर्मिती, बांबू अथवा त्यापासून तयार केलेल्या वस्तूंची विक्री. असे अनेक पर्याय जेव्हा समोर येतात तेव्हा हे विद्यार्थी चौकटी बाहेरचा विचार करू लागतात असा मॅडमचा विश्वास आहे.
आपल्या विद्यार्थ्यांना यश संपादन करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर अंजली पाटील मॅडम यांना माझे शतशः नमन.

चिदंबर नीलकंठ शिंदे
पेपर्स एन शेपर्स
कोल्हापूर
#नवदुर्गा
Anjali Patil

सौ पल्लवी रवींद्र कुलकर्णी पुण्यामध्ये इंटिरियर डिझाईनर म्हणून काम करत असताना त्यांना लँडस्केप डिझाईनिंग चा एक प्रोजेक्ट...
28/09/2025

सौ पल्लवी रवींद्र कुलकर्णी
पुण्यामध्ये इंटिरियर डिझाईनर म्हणून काम करत असताना त्यांना लँडस्केप डिझाईनिंग चा एक प्रोजेक्ट मिळाला. काम करताना त्यांना त्यात खूप रुची आली आणि त्यानंतर तसे प्रोजेक्टही त्यांना मिळत गेले. एखाद्या पारंपारिक कामात काहीतरी वेगळे पण निसर्गहित सांभाळून बदल करणे ही त्यांची खासियत आजही कायम आहे. प्रोजेक्ट मिळाल्यावर त्या परिसराचा पूर्ण अभ्यास करणे तेथील इकोसिस्टीम समजावून घेणे व शक्य तेवढ्या प्रमाणात नैसर्गिक साहित्याचा वापर करून इकोसिस्टीम आणखीन घट्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याचबरोबर आपल्या ग्राहकाला किचन गार्डनिंग, कंपोस्टिंग, वॉटर हार्वेस्टिंग याबद्दल माहिती देऊन त्याचा फायदा कसा होतो हे त्यांना पटवून देण्याचे काम आजही सुरू आहे.
पल्लवी मॅडम यांचे सामाजिक क्षेत्रातही मोठे काम आहे. त्या गार्डन क्लबच्या अध्यक्ष म्हणून खूप वेगवेगळे आणि नाविण्यपूर्ण काम करतात. कुठलेही काम हे संघटित होऊन केले तरच ते लवकर होते व जास्त काळ टिकते असे त्यांचे मत आहे.
गार्डन क्लब हा पूर्वी सौंदर्यवृद्धी केंद्रित होता. निसर्गचक्रात होणारे बदल पाहता फक्त सौंदर्यवृद्धी केंद्रित न राहता त्यामध्ये अजून बऱ्याच गोष्टी सामावून घेऊन दृष्टिकोन विस्तारित केला पाहिजे असे आधीच्या पदाधिकाऱ्यांना वाटले त्यांनी त्याची सुरुवात ही केली आणि पल्लवी मॅडमने अतिशय उत्तमरीत्या ते वृद्धिंगत केले. सध्या गार्डन क्लब ही संस्था वेगवेगळ्या सहा विभागात काम करत आहे आणि हे काम पूर्ण वर्षभर चालते.
१.देशी बियांचे संवर्धन - यामध्ये देशी झाडांच्या बियांचे संकलन करून त्याची सीड बँक करणे. लुप्त होत चाललेल्या झाडांच्या बिया मिळवणे. अशी झाडे कुठे कुठे आहेत त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध करून त्या झाडाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे.
२.ग्रीन शॉपी - वेगवेगळ्या पर्यावरणपूरक वस्तू एका छताखाली आणून लोकांना पर्यावरणपूरक वस्तू व उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देणे व त्या वस्तूंचा प्रचार करणे.
३.क्लीन ग्रीन सिटी - लोकांना कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व आणि त्याचे वर्गीकरण कसे करावे समजावून दिले जाते. यासाठी 100 हरित दूतांची नेमणूक सुद्धा केलेली आहे. वेगवेगळ्या विभागात या संदर्भातील प्रबोधन केले जाते.
४.ग्रीन फिंगर - बाग संवर्धनाचे काम करणाऱ्या माळी दादांसाठी नवनवीन तंत्रज्ञांची माहिती करून देण्याचं काम यामध्ये केले जाते.
५.ग्रीन क्रेडिट्स - विविध ठिकाणी नुसते वृक्षारोपण न करता ती झाडे जगवणे हा मुख्य उद्देश. पल्लवी मॅडम सांगतात की वृक्षारोपणानंतर साधारण 91% झाडे आम्ही अतिशय उत्तम स्थितीत वाढवलेली आहेत.
६.ग्रीन एज्युकेशन - ग्रीन एज्युकेशन हा शिवाजी विद्यापीठा अंतर्गत एक वर्षाचा अभ्यासक्रम आहे आणि त्यास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आपल्या पिढीकडून ज्या चुका झाल्या आहेत त्या पुढील पिढीकडून होऊ नये म्हणून शाळा, कॉलेज मध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. आजची तरुण पिढी ही टेक्नोसॅव्ही आहे याचा विचार करून शॉर्ट फिल्म, फॅशन शो असे आधुनिक, तसेच स्कीट, निबंध लेखन, स्पॉट गार्डनिंग यासारखे उपक्रम घेतले जातात. हे उपक्रम करत असताना मुले निसर्गाच्या अधिक जवळ जातात. स्पर्धेमुळे त्यांचा निसर्गाबद्दल अभ्यास होतो आणि निसर्ग संवर्धन किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. तसेच त्यांनी केलेल्या कलाकृतीमुळे निसर्ग रक्षणाचे महत्त्व प्रेक्षकांच्याही लक्षात येते. या उद्देशाने सुरू झालेल्या या प्रयोगाला खूप सुंदर प्रतिसाद व यश मिळत आहे.
पल्लवी मॅडम या दुसऱ्यांना मदतीसाठी सदैव आनंदाने उपलब्ध असतात. त्यांच्या कामाविषयी ज्यावेळी कौतुक होते त्यावेळी त्या हे यश माझ्या एकटीचे नसून गार्डन क्लबच्या सर्व सदस्यांचे आहे. मी फक्त आधीच्या पदाधिकाऱ्यांनी कल्पकतेने केलेले बदल पुढे घेऊन निघाले आहे हे आवर्जून सांगतात.
अशा या मितभाषी पण निसर्ग संवर्धनाचे खड्ग हाती घेतलेल्या माऊलीला माझे शतशः नमन.

चिदंबर नीलकंठ शिंदे
पेपर्स एन शेपर्स
कोल्हापूर

#नवदुर्गा
Pallavi Kulkarni

डॉ. विदुला अरुण स्वामी.मूळच्या साताऱ्याच्या असलेल्या डॉक्टर विदुला मॅडम या कोल्हापुर येथील के आय टी कॉलेजमध्ये प्रोफेसर ...
27/09/2025

डॉ. विदुला अरुण स्वामी.
मूळच्या साताऱ्याच्या असलेल्या डॉक्टर विदुला मॅडम या कोल्हापुर येथील के आय टी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून 2023 पर्यंत कार्यरत होत्या. कॉलेजमध्ये शिकवत असताना नेचर क्लब मध्ये सहभागी झाल्या तिथे सुरुवातीला करकरे सर व नंतर सुहास वायंगणकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण, बर्डवॉचिंग, नर्सरी या गोष्टी सुरू झाल्या.
या सर्व गोष्टी बरेच निसर्गप्रेमी करत आहेत आपण काहीतरी वेगळे केले पाहिजे ज्यातून पर्यावरणाचे रक्षण होईल. यासाठी नवीन काय करता येईल याचा शोध सुरू होता तेव्हा सविता साळुंखे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली 'प्लास्टिक कचरा मुक्त' हा समूह तयार झाला. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रबोधनाचे वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले त्यातच सर्वात वेगळा असा उपक्रम म्हणजे स्टीलच्या भांड्यांचा वापर.
सुरुवातीस चहा विक्रेत्यांना कागदी कपा ऐवजी आम्ही तुम्हाला मोफत स्टीलची भांडी देऊ तुम्ही ती वापरावीत असे सांगितले पण ती धुण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने तो प्रयोग थोडा मागे पडला. त्यानंतर भाजीविक्रेत्यांना कोटिंग असलेल्या कपातून चहा किंवा गरम पेय घेतल्यामुळे आरोग्यास कसा धोका निर्माण होण्याची शक्यता असते आहे ते पटवून दिले. त्यांना स्टीलची भांडी मोफत देण्यात आली आणि ते भांडी वापरू लागले. त्यामुळे या प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला. असाच प्रयोग त्यांनी रिक्षा दादांच्या बाबतीतही केला. त्यांनीही कागदी कपा ऐवजी हे स्टीलचे भांडे वापरुन त्याला चांगला प्रतिसाद दिला. थोड्या प्रमाणात का होईना पण कागदी कपांच्या ऐवजी स्टीलची भांडी वापरली जाऊ लागली त्यामुळे तयार होणारा कचरा काही अंशी कमी झाला. शाळेमध्ये निसर्ग संवर्धनाच्या कार्यक्रमा साठी जेव्हा प्लास्टिक कचरा मुक्तीची टीम जाते तेव्हा तेथील शिक्षकांना एक कापडी पिशवी आणि तीन ते चार स्टीलची भांडी भेट म्हणून दिली जातात.
तिसरा टप्पा हा खूपच महत्त्वाचा आहे. कारण त्यांनी एक नवीन संकल्पना आणली आणि त्याचे महत्त्व समाजाला पटवून देऊन ती यशस्वीरित्या आजही ती राबवत आहेत. त्या संकल्पनेचे नाव आहे 'स्टील भांडी बँक'. आपल्या घरात एखादा छोटासा कार्यक्रम असतो त्यावेळी आपण कागदी डिश किंवा कागदी ताटांचा वापर करतो. तो टाळण्यासाठी स्टील भांडी बँक सुरू झाली. इथे तुम्हाला नाष्टा व जेवण यांचा सेट मिळतो.
यासाठी तुम्हाला एक छोटीशी अनामत रक्कम द्यावी लागते ती रक्कम आपण भांडी परत दिल्यावर परतही मिळते. सध्या कोल्हापूर शहरात सात ठिकाणी आणि कोल्हापूर जिल्ह्यात तीन ठिकाणी ही बँक कार्यरत आहे. कोल्हापूर मधील प्रत्येक वॉर्ड मध्ये अशी बँक सुरू करण्याचा विदुला मॅडम यांचा मानस आहे. त्यांच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि युज अँड थ्रो चा कचरा कमी होण्यास हातभारही लागत आहे.
जेव्हा जेव्हा त्यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक होते तेव्हा हे सर्व कष्ट आणि यश हे माझ्या एकटीचे नसून हे आमच्या टीमचे आहे असे वारंवार विदुला मॅडम सांगतात.
प्रकाशझोतापासून लांब राहून सतत पर्यावरण संवर्धनात नवनवीन कल्पना राबवणाऱ्या विदुला मॅडमना माझे शतशः नमन.

चिदंबर नीलकंठ शिंदे
पेपर्स एन शेपर्स
कोल्हापूर

#नवदुर्गा

विद्या विकास सावंत शासकीय अधिकारी म्हटलं की आपल्यासमोर एक ठराविक प्रतिमा उभी राहते पण एखाद्या सिनेमातला प्रामाणिक अधिकार...
26/09/2025

विद्या विकास सावंत
शासकीय अधिकारी म्हटलं की आपल्यासमोर एक ठराविक प्रतिमा उभी राहते पण एखाद्या सिनेमातला प्रामाणिक अधिकारी बघितल्यावर आपल्याला जो आनंद मिळतो तो मला विद्याताईंना भेटल्यावर झाला.
नेसरी येथील शिपुर गावात वाढलेल्या विद्या ताईंची नाळ ही लहानपणापासूनच निसर्गाशी जोडली गेली होती. प्राथमिक शिक्षण शिपुर मध्ये झाल्यावर नंतर त्यांनी माध्यमिक व कॉलेज नेसरी मध्ये पूर्ण केले त्यानंतर कागल मध्ये एग्रीकल्चर चा डिप्लोमा पूर्ण केला ग्रामपंचायत अधिकारी म्हणून त्या कोकणात रुजू झाल्या. गिरोली, जाफरीगिरोली, गोलीवडे जाळे इथे काम केल्यावर सध्या त्या कागल तालुक्यातील खेबवडे गावात कार्यरत आहेत.
ज्या गावात त्या जातात तिथे त्या देशी व औषधी वृक्षांची लागवड, प्लास्टिक कचरा संकलन याचे काम सुरू करतात. त्याचबरोबर गावातील महिलांचे मेळावे घेऊन त्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम व त्यापासून होणाऱ्या आजारांची माहिती देतात कचऱ्याचे वर्गीकरण कसे करणे कापडी पिशवीचा वापर कसा वाढवला पाहिजे आणि तो का केला पाहिजे यासंदर्भातील माहिती तसेच सॅनिटरी पॅड ची विल्हेवाट योग्य रीतीने कशी करणे गरजेचे आहे यासारखे बरेच उपक्रम त्या घेत असतात.
जयश्री मॅडम यांच्याच प्रमाणे त्या ही नवीन पिढीकडे खूप आशेने बघतात. त्यामुळे वेळोवेळी शाळेत जाऊन वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन निसर्ग रक्षणाचे महत्त्व त्या समजावून सांगतात आणि ग्रामपंचायतच्या मदतीतून विजेत्यांना योग्य ती बक्षीसही देतात जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि निसर्ग संवर्धनासाठी ती मुले आणखीन काम करू लागतील.
सर्वसाधारणपणे खेडेगावात नवरात्राच्या दिवाळीच्या व यात्रेच्या आधी स्वच्छता जोरात होत असते त्यावेळी तो कचरा जमा होतो तो बहुधा गावाबाहेर असणाऱ्या नदी किंवा ओढ्यापाशी टाकला जातो हे विद्याताईंच्या लक्षात आल्यावर त्यांनी गावात दवंडी पिटवली ' गावात ट्रॅक्टर फिरवला जाईल आणि त्यातच कचरा टाकला पाहिजे' असे सांगितले गेले. नंतर त्यातील बऱ्यापैकी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात त्यांना यश आले.
त्यांच्या निसर्गसंवर्धनाच्या कामासाठी त्यांना यशवंत पंचायत राज, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, आर आर आबा पाटील सुंदर गाव, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जिल्हा परिषद असे शासनाचे पुरस्कारही मिळालेले आहेत. विकासासाठी आपल्याकडे सुविधा कशा नाहीत हे बघत बसण्यापेक्षा ज्या सुविधा आहेत त्याचा पुरेपूर वापर करून काम करत राहणे हे त्यांचे ध्येय आहे.
अशा या निसर्ग रक्षणाचा ध्यास घेतलेल्या मातेला माझे शतशः नमन.

चिदंबर नीलकंठ शिंदे
पेपर्स एन शेपर्स
कोल्हापूर

#नवदुर्गा
Vidya Vikas Jadhav

जयश्री गंगाधरे पहिल्या भेटीत एका खेडेगावातल्या माध्यमिक शाळेत शिक्षिका आहेत असा परिचय झाला पण जसजसा परिचय वाढत गेला तस त...
25/09/2025

जयश्री गंगाधरे

पहिल्या भेटीत एका खेडेगावातल्या माध्यमिक शाळेत शिक्षिका आहेत असा परिचय झाला पण जसजसा परिचय वाढत गेला तस तसे त्यांच्या प्रयोगशील शिक्षणाबद्दल चे नवनवीन पदर उलगडत गेले.

लहान मुलांना निसर्ग संवर्धनाचे महत्त्व समजले तरच निसर्ग टिकेल असे ठाम मत असलेल्या, MSC. Bed. झालेल्या जयश्री मॅडम या राष्ट्रसेवा प्रशालेत सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करतात.
उपलब्ध साधन सामग्री मध्ये विद्यार्थ्यांना उत्तमातले उत्तम निसर्ग संवर्धनाचे शिक्षण देण्याचा ध्यास घेतलेल्या जयश्री मॅडम यांची सुरुवात ही निसर्ग अभ्यासक श्री. सुहास वायंगणकर सर यांच्या मार्गदर्शनामुळे सुरू झाली.

पर्यावरण रक्षण हा विषय फक्त वर्गात शिकवण्यासारखा नाही हे जाणलेल्या मॅडमनी पहिला वर्मी कंपोस्टिंग चा प्रयोग हाती घेतला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना हाताशी धरून पालापाचोळा शेण गोळा करण्याचे काम सुरू केले. कंपोस्टिंग साठी लागणारे कल्चर मॅडमनी स्वतः उपलब्ध केले आणि प्रयोग पूर्णत्वास नेला. गोष्ट एवढ्यावरच थांबत नाही तर तयार केलेल्या वर्मी कंपोस्टिंग गावातल्या लोकांना विकून मिळालेल्या पैशातून शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू विकत घेतल्या. हा प्रयोग अजूनही शाळेत सुरू आहे. त्यांच्या अशा प्रयोगशीलतेसाठी त्यांना बरेच पुरस्कारही मिळालेले आहेत तसेच त्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थेमध्ये कार्यरत सुद्धा आहेत.
कालांतराने त्यांची बदली पुलाची शिरोली येथे झाली पहिल्या दिवशीच शाळेजवळ असणारे तळे दिसले आणि याचे संवर्धन करायचे असा निश्चय करूनच त्यांनी प्रशालेत प्रवेश केला. मॅडमनी मुलांना सुट्टीत तळ्याच्या इतिहासाबद्दल निबंध लिहायला सांगितला. या निबंधामुळे दोन गोष्टींचा फायदा झाला एक तर तळ्याचा इतिहास मिळाला आणि दुसरा मुलांना गावात इकोसिस्टीमचे संतुलन करणारा तलाव होता जो कमळाचे तळे म्हणून ओळखले जायचा व ती कमळे गावातील लोकांसाठी एक उत्पन्नाचे साधन सुद्धा होते. महत्त्वाचे म्हणजे त्याचे पाणी पिण्यायोग्य होते. पुढे ग्रामपंचायतीची मान्यता घेऊन तळ्याभोवती योग्य ती झाडे लावणे, पाण्याची तपासणी करणे, कलकीचे रसायन पाण्यात सोडणे, तळ्याचे इनलेट शोधणे ही सगळी काम मुलांना बरोबर घेऊन झाली. यासाठी त्यांना बऱ्याच तज्ञ मंडळींनी मदत सुद्धा केली आहे. पण शासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही याची खंत मनात असून सुद्धा तळे वाचवण्याचा ध्यास कुठेही डळमळीत झालेला नाही. तसेच वृक्षारोपणाचे कार्यक्रम, पर्यावरण विषयी वेगवेगळी व्याख्याने, पक्षी निरीक्षण, लुप्त होत चाललेल्या झाडांची माहिती व परिसरात असलेल्या झाडांना माहितीचे QR code लावणे असे अनेक प्रयोग शाळेत सतत सुरू असतात.
अशा या प्रयोगशील सरस्वती रुपी शिक्षिकेला माझे शतशः नमन.

चिदंबर नीलकंठ शिंदे
पेपर्स एन शेपर्स
कोल्हापूर

Jayu Gangadhare

Address

Plot No. 2/A/4 Shivswaroop Nagar

416013

Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00

Telephone

+919850302994

Alerts

Be the first to know and let us send you an email when PapiersnShapers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PapiersnShapers:

  • Want your business to be the top-listed Interior Service?

Share