22/01/2025
आज एक मनोगत ऐकत होते एका प्राध्यापका चे, ते ऐकून खरंच मी पण त्यावर विचार करु लागले.त्यांचे मत असे होते की आज तरुण वर्ग जो बिघडत जातोय, त्याला कारणभूत आहे ते आज चे शिक्षण, कसे तर मेडिकल आणि इंजीनियर किंवा सरकारी अधिकारी हेच त्यांचे ध्येय आहे ,का?इतर कुठले ही शिक्षण नको, जमीन असली तरी शेती करायची नाही,कारण जसे पद तशीच बायको, मगर घरात चैनी वस्तु ची लयलूट, भौतिक आनंदा ची आस! आणि नोकरी साठी धावाधाव,
नैतिक मूल्य, जबाबदारी, खरा निर्मळ आनंद सगळं हरवलय, देश मागे पडलाय, परदेश हवाय कारण तिथे भरपूर पैसे
मिळतात.आज शिक्षण ही इतके महाग आहे की शिक्षण झाले की त्यावर जो खर्च झाला त्याची वसूली सुरु होते आणि हे दुष्ट चक्र वाढत जाते
शिक्षणा ने विचार प्रगत होतात असे अजिबात नाही, जिथे माणुसकी नाही, प्रेम नाही, देशभक्ति नाही ते शिक्षण काय कामाचे?सगळयांना नोकरी करायची आहे, मग शेतकऱ्यांच्या मुलांने काय करावे, भिक्षुकी करणार्या ने काय करायचे, गरीब आई बापांनी मुला मुलींना शिकवायचे कसे, शिकवले तर अपेक्षा खूप, कमी शिकलेला मुलगा नको, सतत इतरांशी तुलना दिवसेंदिवस हे सगळे गंभीर होत आहे हे मात्र खरं