ID’s Kitchen

Directions Website

ID’s Kitchen सासू-सुनबाई Duo ♥️
🎥 Reels • Recipes • Homemade Taste
💌 Open for collabs & brand features
📺 YouTube fam growing here👇

02/09/2026

🥟 VEG MOMOS WITH SPICY TOMATO CHUTNEY 🌶️

Make these delicious, soft and spicy Veg Momos at home with a super flavourful tomato chutney! 😋

घरच्या घरी बनवा अगदी टेस्टी, सॉफ्ट आणि स्पायसी व्हेज मोमोज! 😋

Pinned comments:
📌 Comment 1: Full Marathi recipe
📌 Comment 2: Full English recipe

26/08/2026

🥥 नारळी भात | Narali Bhaat

साहित्य:
• बासमती तांदूळ – १ वाटी
• तेल – १ टीस्पून
• मीठ – चवीनुसार
• साजूक तूप – २ टेबलस्पून
• गूळ – ½ वाटी
• ताजा खवलेला नारळ – ½ वाटी
• काजू-बदाम – आवडीनुसार
• लवंगा – ४-५
• दालचिनी – ½ इंच
• वेलची पूड – १ टीस्पून
• पाणी – भात शिजवण्यासाठी

🍚 कृती:

1️⃣ पाणी उकळून त्यात तेल व मीठ घाला. धुतलेला बासमती तांदूळ घालून भात शिजवून घ्या. पाणी निथळून भात बाजूला ठेवा.

2️⃣ कढईत तूप गरम करून काजू-बदाम हलके सोनेरी होईपर्यंत तळून बाजूला काढा. त्याच तुपात लवंग व दालचिनी घालून परतून घ्या.

3️⃣ त्यात गूळ व १ टेबलस्पून पाणी घालून गूळ वितळू द्या.

4️⃣ गूळ वितळल्यावर ताजा खवलेला नारळ घालून छान एकजीव करा.

5️⃣ आता शिजवलेला भात घालून हलक्या हाताने मिक्स करा.

6️⃣ वेलची पूड व तळलेले काजू-बदाम घालून पुन्हा हलक्या हाताने मिक्स करा.

7️⃣ २-३ मिनिटे मंद आचेवर झाकून वाफ येऊ द्या.

🌴 गरमागरम, सुगंधी आणि गोड नारळी भात तयार! 🥥❤️

✨ नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने ही �

11/08/2026

गटारीला नक्की बनवा असं झणझणीत गावरान मटण! 🔥🤤

मसालेदार, झणझणीत आणि एकदम गावाकडच्या चवीचा हा गावरान मटण रस्सा! 😍 बघूनच तोंडाला पाणी सुटणार १००%! 🤤 सोबत गरमागरम भाकरी किंवा भात असेल तर जेवणाची मजाच वेगळी! ❤️

📝 साहित्य

मटण मॅरिनेट करण्यासाठी:
• १ किलो मटण
• ½ टीस्पून हळद
• १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
• १ टीस्पून मीठ
• २ टेबलस्पून दही

मटण शिजवण्यासाठी:
• २ टेबलस्पून तेल
• २ तमालपत्र
• १–२ इंच दालचिनी
• ५–६ काळी मिरी
• ३–४ लवंगा
• १ छोटा तुकडा दगडफूल
• २ चिरलेले कांदे
• १०–१२ लसूण पाकळ्या
• ३ हिरव्या मिरच्या
• मूठभर कोथिंबीर
• आवश्यकतेनुसार पाणी

वाटणासाठी:
• १ कप किसलेलं सुके खोबरं
• १ टेबलस्पून पांढरे तीळ
• १ टेबलस्पून खसखस
• १ इंच आलं
• ४–५ लसूण पाकळ्या
• ½ टेबलस्पून भाजलेली चणाडाळ
• १ टेबलस्पून धणे
• ३ कांदे
• २ टोमॅटो
• कोथिंबीर

अंतिम रश्श्यासाठी:
• २ टेबलस्पून तेल
• १ टीस्पून गोडा मसाला
• १ टीस्पून गरम मसाला
• १ टेबलस्पून कांदा-लसूण मसाला
�

Address

Satara

Alerts

Be the first to know and let us send you an email when ID’s Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share