14/09/2026
*आज (१४ सप्टेंबर) भाद्रपद शुक्ल चतुर्थी / गणेश चतुर्थी...*
महाराष्ट्रच नव्हे, जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पावन पर्वास आज सुरुवात होत आहे. श्री शंकर आणि माता पार्वती यांचा ज्येष्ठ सुपुत्र म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका श्री गणेश / गणपती. आपल्या महान हिंदू संस्कृतीत सर्व देवतांमध्ये अग्रपूजेचा मान श्री गणेशाला देण्यात आला आहे. तो सुखकर्ता, विघ्नहर्ता आहे. तो बुद्धीचा देव आहे. आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी... हा देशातील एक महत्त्वाचा सण / उत्सव आहे, जो विविधता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतिनिधित्व करतो.
प्राचीन काळात घरगुती स्वरूपात साजरा केल्या जाणाऱ्या या सणाला लो. टिळकांनी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. याचा मूळ हेतू होता, ब्रिटिशांविरोधात जनतेला संघटित करण्याचा; जो मोठ्या प्रमाणात साध्यही झाला. तेव्हापासून देशभरात विशेषत: महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गोवा यांसारख्या राज्यांमध्ये गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिकरित्या मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, नेपाळ यांसारख्या देशातही तो साजरा होतो.
विघ्नहर्त्या श्री गणेशाचा हा उत्सव भक्तिभावाने, उत्साहाने साजरा करू या... सर्वांवर त्यांची कृपादृष्टी राहो, हीच प्रार्थना...
गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
#भाद्रपद_शुक्ल_चतुर्थी #श्रीगणेश_चतुर्थी #गणपती_बाप्पा_मोरया #सार्वजनिक_गणेशोत्सव #शुभेच्छा