Aappi's Gharkul

Aappi's Gharkul Aappi's Gharkul is a place where u get Recipes, write ups, stories for kids, blogs, poems, quotes

Happy Mother's day to all beautiful Mom's❤️
12/05/2024

Happy Mother's day to all beautiful Mom's❤️

This is what I call Comfort food too..Kolambo Rice and Homemade Appi Medi Raw mango Pickle😋😋😋😋 Recipe coming soon...
09/05/2024

This is what I call Comfort food too..Kolambo Rice and Homemade Appi Medi Raw mango Pickle😋😋😋😋

Recipe coming soon...

07/05/2024

ओळखा बरे हा कोण?

एकामागून एक येतोस
थांबत जा की जरा
तुझ्या सतत येण्याने
सुचेना बघ काही मला
थांबवू कशी तुला
कळेना बघ अजिबात मला
प्रयत्न बरेच करून झाले
पण तुझे चक्र काही थांबेना
कधी येतोस पटकन जेव्हा
युक्ती छान सुचते मजला
आणि कधी तरी येतोस तेव्हा
घोर लावून जातोस जीवाला
भूतकाळाच्या आठवणीत रमवतोस
तर वर्तमानाच्या दाखवतोस चिंता
भविष्याच्या काळजी ने करतोस
जीव अगदी घाबरा घुबरा
जरा दमाने घ्यायला
जमत नाही का रे तुला
आनंदाश्रू आणतोस कधी
तर कधी आणतोस अश्रुधारा
विश्रांती ची गरज बघ
खरी आहे तुला कळलं ना?
मनात सुद्धा येत असतोस
आणि येतोस डोक्यात सुद्धा
कसे थांबवू सांग बरे आता तुला
माझ्या मनातील तुलाच म्हणजे अनेक विचारांना.....

धन्यवाद
श्रद्धा सोहोनी
७/५/२०२४

Non veg thali for weekend 😋😋Chicken curryTawa PrawnsSurmai FrySol kadhiJeera riceOnion saladChapati
05/05/2024

Non veg thali for weekend 😋😋

Chicken curry
Tawa Prawns
Surmai Fry
Sol kadhi
Jeera rice
Onion salad
Chapati

महाराष्ट्र दिनाच्या आंबामय वेलचीयुक्त शिऱ्यासह रुचकर शुभेच्छा 😋😋
01/05/2024

महाराष्ट्र दिनाच्या आंबामय वेलचीयुक्त शिऱ्यासह रुचकर शुभेच्छा 😋😋

एक जुनी कविता😊महाराष्ट्र दिन शुभेच्छाकोजागिरी जागवतो आम्ही मसाला दुधाने,सत्यनारायणाचा प्रसाद होतो सोप्प्या गोड शिऱ्याने,...
01/05/2024

एक जुनी कविता😊

महाराष्ट्र दिन शुभेच्छा

कोजागिरी जागवतो आम्ही मसाला दुधाने,
सत्यनारायणाचा प्रसाद होतो सोप्प्या गोड शिऱ्याने,
बाप्पांच्या आगमनासाठी मोदक बनवतो तळलेले ,
चतुर्थी साठी कधी बनतात मोदक उकड काढून केलेले,
होळी साठी बनते खास मेजवानी पुरणपोळीची,
खोबऱ्याची वडी ही कायमच आमच्या आवडीची,
दसरा, पाडवा, दिवाळी असो किंवा कोणताही मोठा सण आमचा,
वरण भात,मसालेभात, श्रीखंड पुरी हा खास बेत असतो नैवेद्याचा,
झुणका भाकर कांदा ठेचा आहे आमची शान
महाराष्ट्रीयन जेवणाचा आम्हा मराठी लोकांना असतो कायमच अभिमान,
महाराष्ट्रात नसलो तरी मनाने असतोच आम्ही कायम महाराष्ट्रीयन,
पूजा करतो नेहमी मायभूमीची जिथे कुठे असतो तेथून,
गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असण्याचा
रुचकर शुभेच्छा सर्वांना आमच्या महाराष्ट्र दिनाच्या....

धन्यवाद
श्रद्धा सोहोनी

१ मे २०२१

तळटीप - हे सर्व पदार्थ मी आपल्या सणांना बनवले आहेत अशीच आज मजा करावीशी वाटली म्हणून एक छोटा कविता करायचा प्रयत्न..तसे बरेच पदार्थ आहेत आपले पण हे खास जे आपली महाराष्ट्राची शान आहेत...

25/04/2024

मनातील खंत

काल मी जेवायला मूग मसाला केला होता. मुलगा काल दिवसभर शाळेतून थकून घरी थेट संध्याकाळी आला होता. जेवायला काय आहे हे कळल्यावर त्याचा मूड गेला आणि तो किरकिर करू लागला. त्याला चमचमीत काहीतरी खायचे होते आणि मी प्रचंड थकल्याने नवीन काही करण्याची ताकद माझ्या अंगात नव्हती. त्याने बाबांना येताना रेडिमेड नूडल्स आणायला सांगितलं. मला खूप राग आला असं वाटलं आपण एवढं मर मर थकून जेवण करतो आणि मुलांना त्याची चिंता च नाही. मी सुद्धा रागाने त्याला खूप बोलले आणि एक वाक्य म्हटल, काही वर्षांनी जेव्हा तू शिकायला, नोकरीला बाहेर जाशील तेव्हा तुला माझी किंमत कळेल. तेव्हा तुला ह्या नूडल्स चा कंटाळा येईल आणि वरण भात आठवेल.

एवढं वाक्य मी बोलले आणि पटकन भूतकाळात गेले. अचानक जाणवले आपण सुद्धा घर सोडून आलो होतो. आई बाबांचे घर, सासू सासऱ्यांचे घर ते दिवस लगेच आठवले आणि मनात आले अरे हा सुद्धा आता मोठा होतोय काही वर्षात च हा सुद्धा घरटे सोडून भुर्र उडून जाईल अगदी आम्ही घर सोडून आलो तसे. ह्या विचाराने आधी थोडे वाईट वाटले. मी कशी राहीन ह्याच्याशिवाय असे वाटले.

पण लगेच ठरवलं नाही दुःखी व्हायचं नाही आपले आई बाबा सासू सासरे त्यांनी जर आपल्याला पाठिंबा दिला नसता तर आज इथपर्यंत आपण पोहोचलोच नसतो. त्यांच्या आशीर्वादामुळे जे काही यश आज पर्यंत मिळाले ते आपल्या मुलाला सुद्धा आपण कमवण्यास मदत करायला हवी आणि ती सुद्धा भावनिक होऊन नाही तर प्रॅक्टिकल होऊन. सासूबाईंना आणि आईला आम्ही लांब आल्याचे किती वाईट तेव्हा वाटल असेल हा विचार मनात आला.

मी अगदी माझ्या सासू सासऱ्यांसारखे वागायचे लगेच ठरवले. जेव्हा नोकरीसाठी माझा नवरा पहिल्यांदा बाहेर पडला तेव्हा त्यांना फार वाईट वाटले होते. तो एकटा आहे कसा राहील, काय करेल.. पण लग्नानंतर त्याच्या निदान खाण्याची तरी चिंता त्यांची मिटली होती.. विसाच्या नियमाप्रमाणे मनात असून सुद्धा ते जास्त काळ आमच्याबरोबर राहू शकले नाहीत पण कोविड काळापर्यंत अगदी दर वर्षी दोन दोन महिने येऊन राहायचे आणि आम्ही खूप मजा करायचो. आज त्या फक्त आठवणी राहिल्या.

करोना काळात माझ्या सासूबाईंची तब्येत बिघडली आणि आम्ही विमाने नसल्याने भारतात जाऊ शकलो नाही. त्यांची भेट न झाल्यामुळे मन बेचैन असायचे. बरेचदा सगळं सोडून परत जावेसे वाटायचे . इथे राहून सुद्धा मुलगा म्हणून आपली कर्तव्ये कधीही माझ्या नवऱ्याने टाळली नाहीत.पण त्या वेळी खंबीर पणे आमच्या पाठीशी उभे राहिले ते माझे सासरे. आम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितलं आम्ही आमचं आयुष्य जगलो आता तुमचे काम आहे तुमच्या मुलांचे भविष्य घडवणे. तिथे मुलांच्या शाळा आहेत, नोकरी आहे. आता मधेच तुम्ही इथे आलात तर सगळी घडी विस्कटली जाईल. आणि आमच्या साठी तुम्ही इथे याल आणि आम्हाला काही झालं तर मग काय? आमचं आम्ही आता बघून घेऊ तुम्ही मुलांकडे लक्ष द्या. त्यांचं भविष्य घडवा. आणि कोणी तुम्हाला आमच्या बद्दल बोलल तर सरळ माझ्याशी बोलायला सांगा.

हल्ली मुलं सूना घर सोडून नोकरीसाठी परदेशी किंवा दुसरीकडे राहू लागले की लोकांना चर्वण करायला विषय च मिळतो. सद्य परिस्थती जाणून घ्यायचे सोडून लोक तर्क कुतर्क करू लागतात. मग आजूबाजूचा कसलाही विचार न करता मुलगा आणि सून वाईट म्हणून ठरवून मोकळे होतात. आणि तो मुलगा आणि सून मस्त चर्चेचा विषय बनतात आणि त्याला खतपाणी घालणारे सुद्धा बरेच असतात, दाखवतात की आपल्या बाजूने असतात पण प्रत्यक्षात तो सर्व दिखावा असतो.

असतात ना काही वाईट मुले असतात ही मी नाही म्हणत च नाही , आई वडिलांचा विचार न करून त्यांना दुःख देणारी बरीच असतात. आई वडिलांना उपाशी टाकलेली लोकं सुद्धा मी जवळून पाहिलेली आहेत. पण परदेशी गेलेली सगळीच वाईट नसतात हे लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे.

अश्या वेळी माझ्या मनात एक चटकन विचार कायम येतो. मुलगा बाहेर पडला तर त्याच्या आई वडिलांची कीव केली जाते पण ज्यांना मुलगा नसतो फक्त मुली असतात किंवा काही जणांना मुलेच नसतात, अश्या आई वडिलांनी काय करावे? त्यांना सुद्धा आजारपण येते त्यांना सुद्धा एकटेपण येत असते पण त्यांनी कोणाला सांगावे. मुलगी तर स्वतः चे घर सोडून त्यांना सांभाळायला जाऊ शकते का? नाही मग ते सुद्धा ऍडजस्ट करून राहत असतात. माझ्या आईची सुद्धा हल्ली तब्येत बरी नसते. तरीही ती एकटी सर्व कामे करत असते. खूप आजारपण आलं तरीही आम्हाला नका येऊ आम्ही बघतो ना करू manage असे म्हणते. तुम्ही तुमचा संसार बघा असे कायम सांगत राहते.

आता म्हणाल तर म्हातारपण एकटेपण आम्हाला सुद्धा उद्या येणार आहे. तेव्हा आम्ही सुद्धा कसे manage करू कोण जाणे? आमची मुले तेव्हा कुठे असतील काय करत असतील हे काही आताच सांगता येत नाही. हल्लीची आमची पिढी पन्नाशीत च थकून गेली आहे. सारख्या तब्येतीच्या तक्रारी आताच सुरू झालेल्या दिसतात. म्हणजे आणि वीस वर्षांनी तर पार थकून गेलेलो असू.

पण आज मी मात्र पक्क मनाशी ठरवल आहे लोकांचा विचार बिलकुल करायचा नाही, लोक बोलायलाच असतात त्यामुळे कोणाकडेही लक्ष द्यायचे नाही आपले काम करत राहायचे. कारण चांगल्या मनाने केलेल्या कार्याचे नक्कीच चांगले फळ मिळते ही शिकवण आपल्या मुलांना नक्की द्यायची. आणि आपल्यासाठी मुलांना धरून ठेवायचे नाही त्यांना आकाशात मुक्तपणें उंच भरारी घ्यायला सोडून द्यायचे. अगदी आम्हाला आमच्या आई बाबांनी सोडले तसे. आता पुढे आमच्या ताटात काय वाढून ठेवले आहे ते आम्हाला माहीत नाही, पण निदान तोपर्यंत आयुष्य मजेत जगायचे आणि बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायचे. हो की नाही ?

शेवटी म्हटलेच आहे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा!!!!

धन्यवाद
श्रद्धा सोहोनी
२५/४/२०२४

Summer special Shivrak ( pure veg no onion no garlic)  Konkani simple Thali😋😋 Simple and healthy Satvik Bhojan, My comfo...
22/04/2024

Summer special Shivrak ( pure veg no onion no garlic) Konkani simple Thali😋😋

Simple and healthy Satvik Bhojan, My comfort food😍😍

आंब्या कोळ ( mango curry), तोय (moon dal curry), Rice and Chapati

बालपणीचा ठेवाएक कैरीचे झाड,पडले दृष्टीस आजकैक आठवणी मनी दाटल्याबालपणीच्या त्या खाससुट्टीचा तो मे महिना,आरे कॉलनी चा मॉर्...
18/04/2024

बालपणीचा ठेवा

एक कैरीचे झाड,
पडले दृष्टीस आज
कैक आठवणी
मनी दाटल्या
बालपणीच्या त्या खास
सुट्टीचा तो मे महिना,
आरे कॉलनी चा मॉर्निंग वॉक,
सोबतीस होती कायम,
माझी ती हक्काची गॅंग,
अनेक झाडे आंब्याची
त्याला असायच्या मस्त कैऱ्या
दगड लागता आमचा कैरींना
जमिनीवर पडती त्या पटापटा
गोळा करता करता मात्र हमखास
धावत येत असे मालक झाडाचा
पाहता त्यास दुरून धूम ठोके
आमचा मेळा मित्रमैत्रिणींचा
लगबग लगबग घरी पोहचता
मीठ मिरची लागे त्या कैरीला
स्वाद येत असे फार मात्र
त्या चोरुनी आणलेल्या कैरीला
पाहत बसले ह्या झाडाकडे मी
डोळे भरूनी नकळत आले आज
कैरी हाताशी होती हो पण
नव्हती माझी ती हक्काची गॅंग
दुकानातून आणलेल्या कैऱ्या
आहेत घरी फ्रीज मध्ये चार
पण मिरची मीठ कितीही लावले
तरी ना येई तो बालपणीचा स्वाद
बालपणीचा काळ सुखाचा
उगाच कोणी म्हणत नाही,
मोठे आपण कितीही झालो
तरी मनातले बालपण सरत नाही

धन्यवाद

श्रद्धा सोहोनी
१८ एप्रिल २०२३

आठवणीतला खाऊ -राजगिरा लाह्या दुपारची वेळ आहे. मुलं नुसती डोकं खात आहेत का?? भूक लागली भूक लागली करत डबे शोधत आहेत का? था...
13/04/2024

आठवणीतला खाऊ -राजगिरा लाह्या

दुपारची वेळ आहे. मुलं नुसती डोकं खात आहेत का?? भूक लागली भूक लागली करत डबे शोधत आहेत का? थांबा, लगेच उपाय सांगते. आपल्या बालपणीचा संध्याकाळचा खाऊ आठवतोय का कोणाला? राजगिरा लाह्या कालवून खाल्ल्या आहेत का कोणी बालपणी? नक्कीच असेल...ही काही नवीन रेसिपी नाही पण आता माझ्या घरी एक तासापूर्वी भुकेसाठी तांडव झालं मग काय काढल्या लाह्या आणि कालवून खायला दिल्या मुलांना... अर्थात त्यांच्यापेक्षा मीच जास्त आवडीने खाल्ल्या.. हल्लीच्या मुलांना कुठे आवडतय असल सगळं? पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही ना? एकदा नाही आवडलं तर परत नाही करायचं पण जरूर करून पहायचं..

२ ते ३ चमचे गूळ, अर्ध वाटी खोबर, चवीपुरते मीठ, एक चमचा तूप एका भांड्यात घेवून मस्त मिक्स करून घ्या. त्यावर एक वाटी राजगिरा लाह्या घाला. हाताने प्रेमाने त्यांना छान कालवून घ्या. आणि थोड वरून दूध शिंपडून घ्या ओलावा करण्यासाठी. झालं ५ मिनिटात खाऊ तयार..

मुलं पण खूष, आई पण खूष...

आहे की नाही एकदम सोप्पी रेसिपी? ह्या सर्व रेसिपी सध्या लोप पावत चालल्या आहेत असे मला वाटते म्हणून आपणच त्याची ओळख आपल्या पुढच्या पिढीला करून द्यावी असे मला वाटते.चला तुम्ही पण करा आणि मुलांच्या प्रतिक्रिया जरूर सांगा. तुमच्या बालपणीचे आठवणीतील असे पटकन होणारे अजून कोणते खाऊ पदार्थ आहेत बरं???

धन्यवाद
श्रद्धा सोहोनी
१३/४/२०२४

Address

Singapore

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aappi's Gharkul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aappi's Gharkul:

Shortcuts

Share